मुंबई,दि 19: भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्रीमती सौनिक यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.