महात्मा गांधी जयंतीनिमित्त राजभवन येथे स्वच्छता मोहीम

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राजभवन येथे स्वच्छता मोहीम

मुंबई, दि. 2: राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे दिवंगत नेत्यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

गांधी जयंतीनिमित्त आज राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यपालांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. संपूर्ण वर्षभरात किमान 100 तास म्हणजेच आठवड्यात 2 तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता ठेवण्याची यावेळी सर्वांनी शपथ घेतली.

आजच्या स्वच्छता अभियानात राजभवनातील कार्यालयांचा भाग, राजभवनचा समुद्रकिनारा, निवासी वसाहतीचा भाग व देवी मंदिर परिसर श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here