गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

मुंबई, दि.३० : गेले १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होत्या. अशात चौपाटीवर निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा प्रश्न दर वर्षी निर्माण होतो. त्यामुळे गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व एनसीसीमधील ५०० मुले व मुली आणि अधिकारी अनेक सभासद सहभागी झाले होते. गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी २०० गोण्या निर्माल्य आणि इतर कचरा काढण्यात आला.

या कार्यक्रमाला ब्रिगेडीअर विक्रांत कुलकर्णी आणि माधवाल, कमांडर सतपाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण मैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन एनसीसीच्या वतीने करण्यात येत असते.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here