राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती

नवी दिल्ली 21 : महाराष्ट्र सदनात यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्र सदनातील गणरायाचे दर्शन घेतले  व श्री गणेशाची विधिवत आरती केली.

यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, निवासी आयुक्त व प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री बैस  यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व  जनतेला सुख, समृद्धी लाभू दे !, अशी प्रार्थना केली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here