गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वेगवेगळ्या आंदोलने उपोषण होत आहे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वामध्ये उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या व उपोषणाला पाठिंबा दर्शवला. सत्ताधारी पक्षाच्या अनेक शिष्टमंडळांनी भेटी दिल्या मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाहीये यामुळे अनेक ठिकाणी उपोषण आंदोलन रास्ता रोको होत आहे. हे सगळं सुरू असताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या उपळी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही अशी शपथ घेतली यावेळी शेकडे विद्यार्थी शाळेच्या समोर शपथ घेतली होते.
आमच्यातील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. यामुळे शिक्षण घेताना किंवा उच्च शिक्षण घेताना आम्हाला पैसे अभावी शिक्षण सोडावे लागते. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी आहे. मात्र सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आम्हाला शाळेवर बहिष्कार टाकावा लागत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
या शाळेचे विद्यार्थी संख्या एकूण शंभर असून यामध्ये ६५ विद्यार्थिनी आहेत. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्यासाठी स्वराज शेजुळ, साई शेजुळ, धनश्री महाजन यांनी पुढाकार घेतला. तर यावेळी गावचे सरपंच दिलीप बाबुराव शेजुळ विद्यार्थ्यांचे पालक सांडू पूगले,साहेबराव शेजुळ, गजानन शेजुळ, अनिल शेजुळ हे देखील उपस्थित होते.