मनीष बिलोन ठाकूर (वय ५४), हन्ना मनीष ठाकूर, संदेश मनीष ठाकूर, श्वेता मनीष ठाकूर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मनीष ठाकूरला यवत पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी मनीष ठाकूर हा स्वतः मोठा पोलिस अधिकारी आहे, असे पीडित महिलेला सांगत होता. त्यामुळे तिने बरेच दिवस भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही. शेवटी मानसिक त्रास न सहन झाल्याने तिने यवत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली. मनीष ठाकूर याने यवत परिसर व दौंड तालुक्यात कोणाची धमकी देऊन फसवणूक केली असेल, तर त्यांनी यवत पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
मनीष ठाकूरचा पूर्व इतिहास
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या तपासासाठी पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी पोलिस कॉन्स्टेबल मनीष ठाकूरच्या मदतीने ‘प्लांचेट’च्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या वेळी दौंड येथे राहणाऱ्या मनीष ठाकूरवर गुन्हा दाखल करण्याविषयी दौंड पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने लेखी तक्रार करण्यात आली होती.