‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन

‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन

मुंबई, दि. 8 :   मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खाजगी व शासकीय आस्थापने यांचे सहकार्य घेतले जाते. मतदार जागृतीचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील भाषा तरुण पिढीला सहज समजणारी आहे. हे एक ‘कॉमिक बुक’ असून साध्या सोप्या उदाहरणांतून निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया, सुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्या इ. समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांनी हे आवर्जून वाचावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, आगम संस्थेच्या सहसंचालक भारती दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here