नाशिक: पसंतीच्या मुलाशी लग्न होवू न शकल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या वाडा येथील मैत्रिणीचे मन वळवून तिला नाशिकला सोबत घेऊन आली. रात्रीच्या वेळी दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे गावात आल्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत फिरत असणाऱ्या दोघींची माहिती ग्रामस्थांनी वेळीच पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्यांना काही तासांत कुटुंबियांकडे सुखरूप पोहचवले.
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नाशिक-दिंडोरी रोडवर पिंपळणारे गावात दोन तरुणी घाबरलेल्या अवस्थेत फिरत असल्याबाबत पोलीस पाटील योगेश घोलप, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंचांनी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांना माहिती दिली. कावळे यांनी समयसूचकता दाखवत दोन्ही तरुणींना तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्या घरातील महिलांच्या मदतीने मध्यरात्री बारा वाजता दिंडोरी पोलीस ठाण्यात आणले. त्यांना विचारपूस केली असता एकीचे वय २३ आणि दुसरीचे १७ असून, त्या वाडा तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले.

यातील १७ वर्षीय मुलीचे एका मुलासोबत लग्न होणार होते. परंतु ते झाले नाही म्हणून ती घरातून निघून आली. ती आत्महत्या करण्याच्या विचारात होती. परंतु, तिच्या मैत्रिणीने समजावून सांगत तिला परावृत्त केले. नाशिकला आमच्या नातेवाइकाकडे जाऊ, असे सांगत तिला नाशिकला आणले. त्या पुढे पिंपळणारे येथे आल्या. मध्यरात्री तेथे फिरत होत्या. महिला अंमलदार नाईक, गारुंगे यांनी त्यांची चौकशी करून त्यांना सुरक्षित ठेवले. वाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क करून दोन्ही मुलींचे फोटो पाठवून खात्री केली असता तेथे त्यांच्या हरविल्याचे तक्रार दाखल होती. या गुन्ह्याच्या तपास अधिकारी पल्लवी बाणे यांचे पथक पहाटेच दिंडोरी येथे दाखल झाले. दोन्ही तरुणींना दिंडोरी पोलिसांनी वाडा पोलिसांकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले.