अखेर ‘पीएमपी’ची ती बससेवा बंद, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, नागरिकांचे हाल

अखेर ‘पीएमपी’ची ती बससेवा बंद, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, नागरिकांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे: हडपसर रेल्वे टर्मिनल येथून सुरू करण्यात आलेल्या बसला खूपच कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण देऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या बस अचानक बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल पुन्हा सुरू झाले असून, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू झाली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. हडपसर रेल्वे टर्मिनल येथून सध्या हडपसर-हैदराबाद एक्सप्रेस ही एकमेव रेल्वे सुरू आहे. ही रेल्वे आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी सुटते. याच दिवशी हैदराबाद येथून ही रेल्वे हडपसर येथे सकाळी १० वाजून ५० मिनिटांना येते. हडपसर टर्मिनल येथे उतरल्यानंतर शहरात इच्छितस्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हैदराबाद येथून रेल्वेने पुण्यात येण्यासाठी लागतात, त्यापेक्षा जास्त पैसे हडपसर टर्मिनलवरून शहरात येण्यासाठी रिक्षा चालकांना द्यावे लागत होते. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाकडे हडपसर टर्मिनल येथून बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ‘पीएमपी’ प्रशासनाने नोव्हेंबर २०२२मध्ये बस सेवा सुरू केली होती.

झुरळांच्या सुळसुळाटामुळे प्रवासी हैराण, पनवेल-नांदेड रेल्वे पुणे स्थानकावर थांबवली

स्वारगेट आणि डेक्कन येथून पीएमपीच्या बस सोडल्या जात होत्या. या बस डेक्कन, मनपा, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क मार्गे हडपसर रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट, पुलगेट, लष्कर पोलिस स्टेशन आणि घोरपडी मार्गे हडपसर रेल्वे स्टेशन अशा धावत होत्या. ‘पीएमपी’ने बस सुरू केल्यानंतर रेल्वेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला होता. या बसल चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, पीएमपीने हडपसर टर्मिनल येथून सुटणाऱ्या दोन्ही बसचे उत्पन्न खूपच कमी असल्याचे कारण देऊन, काही दिवसांपासून या बस आचानक बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा रिक्षाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे.

हडपसर टर्मिनल येथे आठवड्यातील तीन दिवस हैदराबाद रेल्वे येते. या गाडीला बऱ्यापैकी गर्दी असते. ‘पीएमपी’ने बस बंद केल्या असल्या, तरी त्या सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. त्यासाठी ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल.

– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे

हडपसर टर्मिनल येथे सोडण्यात येणाऱ्या ‘पीएमपी’ बसला खूपच कमी उत्पन्न मिळत होते. त्यामुळे या बस बंद करण्यात आल्या आहेत.

– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, ‘पीएमपी’

कोकणावासियांच्या प्रवासात खड्डेच, रस्त्यांची अवस्था बिकट, कोणत्याही मार्गे गेलात तरी सुटका नाहीच

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here