बिबट्याचे दोन बछडे विहिरीत पडले; वनविभागाने अशी घडवली आईची भेट

बिबट्याचे दोन बछडे विहिरीत पडले; वनविभागाने अशी घडवली आईची भेट

सातारा : कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे बिबट्याच्या दोन्ही बछड्यांचे मादी बरोबर पुनर्भेट करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले. ही मोहीम रविवारी सायंकाळी राबवण्यात आली. रात्री एक वाजता मादी बिबट्या येऊन पिल्लांना यशस्वीपणे परत घेऊन गेली. यात दोन बिबट्या बछडे सुखरूप होते. एक मादी तर एक नर बछडा होता. हे बछडे साधारण चार ते पाच महिन्याचे वय होते.

याबाबत माहिती अशी की, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्यासह ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी वनविभागाला तातडीने याची माहिती दिली.

दरम्यान, विहिरीत पडलेले बिबट्याचे बछडे विहिरीत जीव वाचविण्यासाठी बराचवेळ धडपड करत होते. अखेर वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बछड्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले होते.

रविवारी सायंकाळी बिबट्या मादी तिच्या पिल्लांना परत घेण्यासाठी यावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. पिल्लांना एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवून त्याचे दार तीन पुलीच्या सहायाने लांब बांधून ठेवण्यात आले. साधारणपणे पिंजऱ्यापासून पुली ओढणारे १५० फूट लांब अंतरावर २० फूट उंचावर होते. पिंजरा शेजारी हालचाल टिपण्यासाठी विशिष्ट कॅमेरे लावण्यात आले.

मादी साधारण रात्री एक वाजता पिंजऱ्याशेजारी घुटमुळू लागली. हे कॅमेऱ्यामध्ये दिसले, त्याक्षणी पुलीच्या साहाय्याने दोर ओढून पिंजऱ्याचे दार उघडून पिल्लांना मादीजवळ मुक्त करून मादी व पिल्लांची पुनर्भेट करण्यात आली.

रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक कैलास सानप, सचिन खंडागळे, अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बेडेकर, वनसेवक भरत पवार, अमोल माने, धनाजी गावडे, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे, शशिकांत जाधव, प्राणीमित्र अजय महाडीक, उदित कांबळे, रोहित कुलकर्णी, गणेश काळे तसेच रेस्कु पुण्याचे हर्षद, एजाज,पशसंवर्धन अधिकारी डॉ. ज्योती यांनी सहभाग घेतला होता.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here