भांडणामुळे जोडपं वेगळं झालं; मुलाच्या वाढदिवशी एकत्र आलं, मात्र पुन्हा पेटला वाद अन् घडलं भलतचं

भांडणामुळे जोडपं वेगळं झालं; मुलाच्या वाढदिवशी एकत्र आलं, मात्र पुन्हा पेटला वाद अन् घडलं भलतचं

ठाणे: डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रेनगर परिसरात राहणाऱ्या एका नव दाम्पत्याच्या लग्नाचा बुधवारी वाढदिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्यांनी यानिमित्ताने एकत्र येऊन वाढदिवस साजराही केला. मात्र यावेळी आई-वडिलांमध्ये भांडण झाले. संतप्त पतीने पत्नीवर सुरीने वार केले. आई-वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी मुलगा मधे पडल्याने वडिलांनी त्यालाही शिवीगाळ केली. त्यानंतर सुरीने हल्ला करुन मुलालाही जखमी केले. या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात मुलाने वडिलांविरुध्द तक्रार केली आहे.
हसतं खेळतं कुटुंब पहाटेच्या भांडणामुळं संपलं, आईला पाहून लेकरांना धक्का, वडिलांना शोधलं अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सखाराम पैलकर (५२) असे वडिलांचे नाव आहे. त्यांचा २८ वर्षीय मुलगा सुरज याच्या तक्रारीवरून वडील सुरेश यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजच्या आई-वडिलांचे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे सुरजची आई सुलोचना ही त्यांच्या कर्नाटकमधील आईच्या घरी राहते. बुधवारी सुरजच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे आई त्याला औक्षण करण्यासाठी कर्नाटकहून आली होती. घरात वाढदिवसाचा कार्यक्रम रात्री पार पडल्यानंतर रात्री साडे अकराच्या दरम्यान सुरजची आई सुलोचना आणि वडील सुरेश यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला.

३ महिन्यांनंतर लेकरू आईच्या कुशीत; ११ महिन्यांच्या बाळाची ३५ हजारांना विक्री, पोलीसांनी लावला छडा

यावेळी संतप्त झालेल्या सुरेश यांनी स्वयंपाक घरातील सुरी घेऊन पत्नी सुलोचनावर वार करण्यास सुरूवात केली. सुरज हे भांडण सोडविण्यासाठी मधे पडला असता त्याच्या छातीवर धारदार सुरीने वार केला. यामध्ये दोघा माय-लेकाला दुखापत झाली. तरीही सुरेश यांनी सुरज आणि त्याच्या आईला मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून पुन्हा काही गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुलगा सुरज याने वडिलांविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी फौजदार नंदकिशोर काते अधिक तपास करत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here