क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

नागपूर : नागपुरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरी येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने कामासाठी घरी आणलेल्या ७ वर्षीय मुलीला घरात डांबून ठेवून घरकाम करून तिच्या छाती व गुप्तांगाला चटके देऊन तिला शारीरिक यातना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी दाम्पत्य चार दिवसांपूर्वी मुलीला एकट घरात कोंडून बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आरडाओरडा केल्यानंतर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हुडकेश्वर पोलिसांनी मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिपळा फाटा-बेसा रोडवरील अथर्व नगरीमध्ये एक फ्लॅट दुबईत राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यात एक जोडपे भाड्याने राहतात. हे दाम्पत्य पंजाब-हरियाणा येथून ७ वर्षांच्या मुलीला कामासाठी घेऊन आले होते. मुलगी घरातील सर्व कामे करते. हे लोक नेहमी मुलीला मारहाण करून अत्याचार करायचे. चार दिवसांपूर्वी फ्लॅटला कुलूप लावून दाम्पत्य बेंगळुरूला निघून गेले. त्यांनी मुलीला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. तिच्या खाण्यासाठी काही ब्रेडची पाकिटे ठेवली होती. वीज बिल न भरल्याने बुधवारी काही कर्मचारी फ्लॅटचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी आले होते. त्यांना खिडकीतून एक लहान मुलगी हात पसरून मदत मागताना दिसली. कर्मचाऱ्यांनी याची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मुलीला बाहेर काढले.

शेजारी राहणाऱ्या जंगले नावाच्या जोडप्याने मुलीला बाहेर काढले, घरी नेले आणि जेवण दिले. ते तिला आंघोळ घालत असताना मुलीच्या छातीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर चटके दिल्याची खुणा दिसल्या. मुलीला विचारले असता ती खूप घाबरली होती. मुलीने सांगितले की, तिला कारमध्ये बसवून येथे आणण्यात आले. मुलीने सांगितले की, माझे आई-वडील पंजाबमध्ये राहतात. तिच्या शरीरावर प्रत्येक भागावर गरम तव्याच्या, सिगरेटच्या चटके दिल्याच्या खुणा दिसत आहे.

मागील दोन ते तीन वर्षापासून हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अथर्व नगरी तीन मधील १९ नंबरच्या घरामध्ये एक दाम्पत्य किरायेने राहत होतं.त्यांच्या घरात आठ ते दहा वर्ष वयाची ही चिमुकली मागील साधारण दोन वर्षापासून राहत असल्याची माहिती शेजाऱ्याने दिली. ती मुलगी कोण आहे, कुठून आणली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. या मुलीच या दाम्पत्याशी काय नात आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही. यानंतर घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here