माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप

माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप

नागपूर : आजारपणामुळे पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी मृतदेह घेऊन त्यांच्या मूळ गावी गेली. सिर्सी गिरड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. धक्कादायक म्हणजे ज्या रुग्णवाहिकेतून महिलेच्या पतीचे पार्थिव नेण्यात आले, त्याच रुग्णवाहिका चालकानेच आपल्या मुलाला टीप देऊन हा संपूर्ण प्रकार घडवून आणला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यासोबतच आरोपींकडून शहरातून वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत.

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, मठात ९५ वर्षीय वैद्यासह सेवेकरी महिलेचा निर्घृण खून
सक्करधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार क्वार्टर परिसरात राहणारी फिर्यादी महिला कल्पना घोडे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना २५ ऑगस्ट रोजी घडली, तेव्हा कल्पना आपल्या पतीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन सिर्सी गिरड या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या.

पतीने घरातून हाकललं, पत्नीची इमारतीच्या जिन्यातच आत्महत्या, पुण्यातील रविवार पेठेत धक्कादायक प्रकार
घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला आणि यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना एक आरोपी आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

Rakshabandhan : भावाच्या निधनानंतरही त्याच हातांना राखी बांधते बहीण, अवयवदान झालेल्या तरुणाशी अनोखे बंध
रुग्णवाहिका चालक अश्वजित वानखेडे यांनी आपल्या मुलामार्फत टीप देऊन ही चोरी करून घेतली. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रितेश वानखेडे आणि त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे यालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.

पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे वाहनांची तोडफोड तिथेच काढली धिंड

चौकशीदरम्यान, आरोपींनी शहरातील सक्करदरा, अजनी आणि इमामवाडा पोलिस स्टेशन परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून पाच दुचाकीही जप्त केल्या. तिन्ही आरोपी हे अमली पदार्थांचे व्यसनी असून आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी ते शहरात चोरीच्या या घटना करत होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here