बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन – महासंवाद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन – महासंवाद

मुंबई, दि. 29 : पालकमंत्री आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीसुविधांच्या मागण्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज आर. एस. निमकर महानगरपालिका दवाखाना, प्रतीक्षा टॉवर जवळ, फॉरस रोड, मुंबई येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री श्री. लोढा यांनी शिबिराला भेट दिली.

या शिबिराद्वारे प्राथमिक आरोग्य चाचण्यांसह नागरिकांना मोफत औषधे सुद्धा उपलब्ध होणार आहेत. यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी विभागांच्या विविध स्टॉलची पाहणी करीत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महिलेचे स्वास्थ्य चांगले असेल, तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. त्या अनुषंगाने महिलांच्या स्वास्थ्य विषयक तक्रारींच्या निवारणासाठी शिबिर महत्त्वाचे होते. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरु असलेल्या या शिबिरात प्रभागातील महिलांची तपासणी करण्यात आली.

****

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here