ठाकरे गटाला धक्का! अजून एका कार्यकर्त्याने सोडली साथ; शिंदे गटात मिळाली नवी जबाबदारी

ठाकरे गटाला धक्का! अजून एका कार्यकर्त्याने सोडली साथ; शिंदे गटात मिळाली नवी जबाबदारी

नांदेड: पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. ठाकरे गटाचे कट्टर समर्थक समजले जाणारे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी देखील ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले आहे. नुकताच त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाबुराव कदम हे मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. पक्ष सोडणार अशी चर्चा देखील सुरु होती. अखेर कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सहभागी झाल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
पुणेकर तुम्हाला ‘सुपर पालकमंत्री’ म्हणतात; पत्रकाराची गुगली, अजित पवारांचा षटकार, म्हणाले…
बाबुराव कदम हे अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचे शिवसैनिक होते. शिवसेनेकडून त्यांना जिल्हा प्रमुख पदाची जवाबदारी देण्यात आली होती. २००९ साली त्यांनी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार क्षेत्रातून त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने बाबुराव कदम ऐवजी नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिले. २०१९ च्या निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कदम यांनी फॉर्म मागे घेतले. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही शिवसेनेकडून त्यांना डावलण्यात आले. ठाकरे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिले. तेव्हा नाराज झालेले बाबुराव कदम यांनी हदगाव हिमायतनगर मतदार क्षेत्रातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

उद्धव ठाकरे घरात बसले होते, आताचे मुख्यमंत्री जनतेच्या दारात जातात, देसाईंचा पलटवार

अवघ्या सहा हजार मताने त्यांचा पराभव झाला होता. बाबुराव कदम यांची हदगाव, हिमायतगर तालुक्यात मानणारा वर्ग देखील मोठा आहे. गोर गरीब आणि शेतकऱ्यांच्या मदतीला ते नेहमी तत्पर असतात. पक्षाकडून अन्याय होतं असल्याने कदम हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा सुरु होती. अखेर ते शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले. बाबुराव कदम हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होताच त्यांना पक्षाकडून त्यांची जिल्हा प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड उत्तर, हदगाव आणि किनवट या तीन तालुक्यासाठी जिल्हा प्रमुख असणार आहेत. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आनंद चव्हाण, खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here