पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ३१ ऑगस्टला शहरातील ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ३१ ऑगस्टला शहरातील ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (३१ ऑगस्ट) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

या कामामुळे पर्वती जलकेंद्रातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर तसेच एचएलआर परिसर, चतु:शृंगी टाकी, कोंढवे-धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र आणि त्यावर अवलंबून परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे शुक्रवारी एक सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
पुणेकर तुम्हाला ‘सुपर पालकमंत्री’ म्हणतात; पत्रकाराची गुगली, अजित पवारांचा षटकार, म्हणाले…

या भागात राहणार पाणी बंद

पर्वती MLR टाकी परिसर

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, लोहिया नगर, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर.

पर्वती HLR टाकी परिसर

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर १ आणि २, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. ४२,४६), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग

संपूर्ण हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, जगताप चौक, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स इ.

नवीन व जुने होळकर जलकेंद्रांत येणारा भाग – मुळा रस्ता, हरीगंगा सोसायटी, संपूर्ण खडकी कॅन्टोनमेंट परिसर, MES, HE फॅक्टरी

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर

पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हण मळा, लमाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता

गांधी भवन टाकी परिसर

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज, ऑर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील शिवणे इंडस्ट्रीज परिसर

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर – कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक १ ते १०, एस.एन.डी.टी. (M.L.R.) आणि चतु:श्रृंगी टाकी परिसर

गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा भाग, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बझार परिसर, बंधन सोसायटी परिसरत. डीपी रस्ता (काही भाग), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी.पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, सहकारनगर वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भारतनगर, अर्चनानागर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर

एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर

गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किस्किंदा नगर, जय भवानी नगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी,भंडारकर रोड, प्रभात रोड, हनुमान नगर, पोलीस लाईन, संगमवाडी

जुने वारजे जलकेंद्र भाग

रामनगर, अहिरे गाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी

कोंढवे-धावडे जलकेंद्र

वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग-२ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर

भामा आसखेड जलकेंद्र परिसर

लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here