पोलीस भरतीचं स्वप्न विरलं, धावण्याच्या सरावासाठी जाताना काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

पोलीस भरतीचं स्वप्न विरलं, धावण्याच्या सरावासाठी जाताना काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

सातारा : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला. कोयनानगर मार्गावर शुक्रवारी रात्री आयशर चारचाकी गाडी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जखमींवर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस भरतीची तयारी करणारे दोन्ही युवक अपघातात मृत्यू पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक
याबाबत अधिक माहिती अशी, कोयना विभागातील तोरणे प्रसाद आनंदा कदम (वय २३ वर्ष) आणि प्रणय उत्तम कांबळे (वय २२ वर्ष, कोयनानगर हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय १८ वर्ष, नाशिक, सध्या रा. कोयनानगर) असे तिघे दुचाकीवरून निघाले होते. गोषटवाडी गावाजवळ वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर कोसळले.

कल्याणमध्ये १७ वर्षीय तरुणाची हत्या, भाजप युवा पदाधिकाऱ्याला अटक, घटनेच्या दिवशी मोर्चातही सहभागी
या अपघातात दुचाकीवरील धीरज संतोष बनसोडे हा युवक जागीच ठार झाला. तर प्रणय उत्तम कांबळे याला उपचारासाठी गाडीतून नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रसाद कदम हा जखमी झाला असून, त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं
पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी रनिंग करण्यासाठी गेलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने कोयना परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर अत्यंत भयानक चित्र घटनास्थळी होते. कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल केले. तर सदरील घटनेतची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जळगावात पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यात बेदम मारहाण, शिंदे गटाच्या आमदारांनी दिली होती धमकी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here