जळगाव जिल्ह्यात गोवंशाची एकूण पाच लाख ७८ हजार जनावरे असून, आगामी चार दिवसांत उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धन उपायुक्त शशिकांत पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अंमळनेर व धरणगाव तालुक्यात ‘लम्पी’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यात १७५ पशूधनाच्या आयुष्यावर ‘लम्पी’चे संकट उभे ठाकले आहे. ‘लम्पी’वर नियंत्रण मिळविण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत पशूसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश होईपर्यंत सातही तालुक्यातील गुरांचे भरणारे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात व अन्य राज्यातून होणारी पशूधनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस व आरटीओ प्रशासनाने आंतरराज्य सिमेवर कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुकानिहाय मृत जनावरे
धरणगाव -०१
पारोळा -०७
एरंडोल -०८
पाचोरा -०५
चाळीसगाव-५२
भडगाव-०६
अमळनेर-०१
एकूण -७९