उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा बीडमध्ये २७ तारखेला होत असतानाच या सभेचे नियोजन धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. या सभेसाठी धनंजय मुंडे यांनी मोठा दाम डोलारा केला असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये ४० ते ५० फुटाचे अजित पवार गटातील मंत्र्यांचे बॅनर त्यासोबत अनेक होल्डिंग जिल्हाभरात लावण्यात आले आहे. यामध्ये शरद पवारांनी ज्याप्रमाणे सभा झाली, त्यापेक्षा दहा पटीने ही सभा डौलदार व्हावी, यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र यामध्येच शेतकरी पुत्राने या सभेआधीच याच परिसरामध्ये एक बॅनर लावला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहा प्रश्न विचारले आहेत.
या सहा प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील मराठवाड्यातील शेतकरी यांचे प्रश्न या बॅनरबाजीमधून विचारण्यात आलेले आहेत. यावर या सभेमध्ये आपण उत्तर देणार? का असाही सवाल या शेतकरी पुत्रांनी केला आहे. सध्या सततचा दुष्काळ कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता कृषिमंत्री पद हे बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राकडेच आले असल्याने आणि तेच भूमिपुत्र उपमुख्यमंत्री यांच्या गटात असल्याने आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे रखडलेले आहेत. यातच आता जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची राजकीय पटलावरची सभा होत आहे. त्यामध्ये बीडच्या विकासासाठी ही सभा घेत असल्याचे आवाहन खुद्द कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं असल्याने बीड जिल्ह्यातील शेतात संकटाला तोंड देणारे शेतकरी यांच्या आता अपेक्षा या धनंजय मुंडेंकडून वाढल्या आहे.
मात्र उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सध्या राज्यात काम करत आहेत. यासाठीच शेतकरी पुत्रांनी आता शेतकऱ्यांच्या दुःखावरील मागण्यासाठी आता निवेदन नव्हे तर थेट बॅनरच्या माध्यमातून सभास्थळ्याच्या समोरच बॅनर लावून सहा मागण्या केल्या आहेत. आता यामध्ये शेतकऱ्यांनी सभेमध्ये या मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रश्न उचलत यावर उत्तर द्यावे, अशी देखील मागणी केली आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मंत्री नेमकं बीड जिल्ह्याच्या हितासाठी काय निर्णय घेणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे. मात्र याआधी शेतकरी आक्रमक होत अशा पद्धतीने जर प्रश्न उभा करत असतील तर यावर निर्णय घेणार कोण? असाही प्रश्नचिन्ह उभा राहत आहे.