मुंबई, दि. १४ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००