गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून, पिंपरीत फिल्मी थरार

गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून, पिंपरीत फिल्मी थरार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील सांगवी परिसरात सराईत गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सागर शिंदे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेतील मृत आरोपी २०१३ मध्ये घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी होता. हत्या करणारा मृत व्यक्तीचा मित्र असल्याचे समोर आले आहे. योगेश जगताप असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं
याबाबत मिळालेली सांगवी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत सागर शिंदे आणि आरोपी हे एकाच कारमधून सांगवी परिसरातील औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ आले. त्यांनी गाडीमध्येच सागर आणि आरोपी योगेश जगताप यांच्यात पैशावरून वाद झाला. वाद होता होता तो विकोपाला गेला. त्यानंतर आरोपी योगेश जगतातने सागरवर पहिली गोळी झाडली. सागर गाडी बाहेर निघून पळू लागला, मात्र तेवढ्यात योगेश जगतापने सागरच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यामध्येच सागरचा जागेवरच मृत्यू झाला.

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं
सांगवी परिसरात असणाऱ्या भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी योगेश जगताप आपल्या सहकाऱ्यासोबत गाडीतून खाली उतरला. त्याने चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवत अडवलं आणि त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.

पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे वाहनांची तोडफोड तिथेच काढली धिंड

चित्रपटात घडणाऱ्या प्रसंगप्रमाणे हा प्रकार घडला. त्यानंतर गुंड विरोधी पथकाने गोळीबार करणाऱ्या योगेश जगताप याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here