चांद्रयान-३ मध्ये खामगावचा बहुमूल्य वाटा; बुलढाण्याची मान गर्वाने उंचावली, जाणून घ्या कारण

चांद्रयान-३ मध्ये खामगावचा बहुमूल्य वाटा; बुलढाण्याची मान गर्वाने उंचावली, जाणून घ्या कारण

बुलढाणा: नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव आज इतिहासात अभिमानाने नोंदवले गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या इतिहासात नवे सुवर्णपान जोडले गेले आहे. अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान-३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा होता. या चांद्रयानात खामगाव एमआयडीसीमधील विकमसी फेब्रीकेशनचे थर्मल शिल्ड आणि श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या होत्या. ही खूप मोठी उपलब्धी असून यामुळे खामगावची देशात नवी ओळख निर्माण झाली आहे.
भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहीम सुरु झाली. यानंतर अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर श्रीहरीकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. होते. हे चांद्रयान बनविण्यासाठी असंख्य शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत लागलेली असून या चांद्रयानाच्या निर्मितीत रजतनगरी खामगावचे मोलाचे योगदान होते. देशभरात प्रसिध्द असलेल्या खामगाव एमआयडीसीमधील विकमसी फेवीकेशनचे थर्मल शिल्ड या चांद्रयानात वापरण्यात आले आहेत. हे शिल्ड बनविण्यासाठी प्रचंड मेहनत लागली असून खामगावातील वस्तू चांद्रयानात वापरली जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

पुणे तिथे काय उणे, चांद्रयान मोहिमेच्या यशाचं जंगी सेलिब्रेशन, बालगंधर्व चौकात गर्दी

या चांद्रयानात खामगाव एमआयडीसीमधील विख्यात श्रध्दा रिफायनरीकडून बनविण्यात आलेल्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या होत्या. यामध्ये ९० टक्के चांदी आणी १० टक्के कॉपर असते. याआधी या सिल्व्हर स्टलिंग ट्युब विदेशातून मागविण्यात येत होत्या. मात्र आता खामगावातील श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात येतात, अशी माहिती श्रध्दा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली होती. चांद्रयानात लागणाऱ्या वस्तू खामगावातून जाणे ही संपूर्ण खामगावकरांसाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे खामगावची नवी ओळख देशाला झाली असून खामगावच्या इतिहासात ही उपलब्धी सुवर्ण अक्षरांनी आज लिहिली गेली. चांद्रयानचे आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यामुळे संपूर्ण देशासह खारीचा वाटा असलेल्या बुलढाण्यातील रजत नगरी खामगावमध्ये उत्साह आणि आनंद साजरा करण्यात आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here