रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी नेरुळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान , पोहचले आणि तत्काळ त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.
नवी मुंबई मुंबईतील नेरूळ येथे इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार झाले असून इतर व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. नेरूळ सेक्टर सहा येथे बुधवारी रात्री आठ वाजता चार मजली इमारतीतील एका विंगचे स्लॅब कोसळून एक महिला व एक पुरुष ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना डॉ. डी वाय पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेरूळ येथे सेक्टर सहा तुलसी भवन इमारत आहे. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरू होते. अचानक तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने खालील दोन स्लॅब देखील कोसळले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. यात महिला रहिवाशी असून पुरुष कामगार असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना कळताच आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य अभियंता संजय देसाई यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने डेब्रिज हटवण्यात सुरुवात करत जखमींना रूग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी मोठी गर्दी
दरम्यान नेरुळमधील सरसोळे येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब त्या पाठापोठ दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याचं कळताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रशासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.