विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी साजरा केला चांद्रयान मोहिमेच्या यशाचा आनंदोत्सव 

विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी साजरा केला चांद्रयान मोहिमेच्या यशाचा आनंदोत्सव 

मुंबई दि. 23 : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत विक्रम लॅण्डरने चंद्राच्या दक्षिण ध्रुव पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करताच विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात एकच जल्लोष झाला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या ऐतिहासिक क्षणांचे सर्वांना साक्षीदार होता यावे यासाठी मध्यवर्ती सभागृहात मोठ्या पडद्यावर प्रोजेक्टरच्या सहाय्याने प्रक्षेपणाची व्यवस्था केली.  बहुप्रतिक्षित असे सॉफ्ट लँडिंग क्षणाचे हे दृश्य मोठ्या पडद्यावर झळकताच “वंदे मातरम्” आणि “भारतमाता की जय” च्या घोषणांनी मध्यवर्ती सभागृह दणाणून गेले. विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी टाळ्यांचा गजर आणि विजय घोषणांद्वारे इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

—–

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here