नाशिक आयटीपार्कचा प्रश्न चिघळणार? ‘त्या’ जमिनीच्या अट्टाहासामुळे भाजप-शिंदेसेनेत वादाची ठिणगी

नाशिक आयटीपार्कचा प्रश्न चिघळणार? ‘त्या’ जमिनीच्या अट्टाहासामुळे भाजप-शिंदेसेनेत वादाची ठिणगी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक महापालिका क्षेत्रात आडगाव शिवारात आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा असतानाही शिवसेना शिंदे गटाकडून दिंडोरीतील अक्राळे येथे शंभर एकर जागा आरक्षित करण्यावरून भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केल्यानंतर नाशिकमध्ये जागा उपलब्ध असताना अक्राळेत जागा घेण्यासाठी उद्योग विभागाचा अट्टाहास का? असा सवाल भाजपनेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रीय लघुउद्योगमंत्र्यानी या ठिकाणी पायाभूत सुविधेसाठी शंभर कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही शिंदे गटाने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये आयटी पार्क करण्याची घोषणा केली होती. आडगाव शिवारात पालिकेची १० एकर जागा आरक्षित असून, या जागेच्या अवतीभवती असलेल्या जवळपास शंभर एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. त्यासाठी महासभेने ठराव करत या ठिकाणी केंद्रीय सूक्ष्म, मध्यम लघु उद्योगमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत कुदळही मारण्यात आले होते.

तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघड, एकजण ताब्यात

उत्तर महाराष्ट्रातील छोटे आयटी पार्कचे युनिट एकाच जागेत स्थापन करण्याबरोबरच मुंबई, बेंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, पुणे, हैदराबाद या शहरांमधील आयटी कंपन्यांना नाशिकमध्ये निमंत्रित करून काही प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या उद्देशासाठी आयटी कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली होती. परंतु प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर आयटी पार्क प्रकल्प लाल फितीत अडकला. या आयटी पार्कसाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू असतानाच, शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी अक्राळेत शंभर एकर जागा संपादित करण्याची मागणी उद्योगमंत्री सांवत यांच्याकडे केली. त्याला सावंत यांनी तत्काळ प्रतिसाद देत एमआयडीसी शेजारी १०० एकर जागा देण्याची घोषणा केली.

वादाची ठिणगी

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामे दाखविण्याची स्पर्धा तिन्ही पक्षांमध्ये सरू झाली. त्याचाच फटका आता आडगाव आयटी पार्कलाही बसत आहे. आडगाव शिवारात भाडेतत्तावर जागा, आयटी कंपन्यांसाठी महत्त्वाची ठरणारी जवळ असलेली विमानसेवा, महामार्गापासून शंभर मीटर अंतर, तर मेडिकल कॉलेज व रुग्णालय अशा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सदरची जागा योग्य असतानाही याकडे दुर्लक्ष करत अक्राळे येथील जागेचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल आता भाजपच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. भाजप आमदारांकडूनदेखील यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

आडगाव शिवारातील आयटी पार्कसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असून, महापालिका हद्दीतच तो झाला पाहिजे. केंद्र सरकारदेखील यासाठी शंभर कोटी रुपये देण्यास तयार आहे. यामुळे शहराचा विकास होऊन रोजगारालाही चालना मिळणार आहे.

-सतीश कुलकर्णी, माजी महापौर.

आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here