सोनी येथील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

सोनी येथील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- मिरज तालुक्यातील सोनी  येथील जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना, दलीत वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरण आणि बिरोबा मंदिर सभा मंडप कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

सोनी येथे काल झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या समवेत खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री खाडे म्हणाले, जलजीवन योजनेमुळे सोनीसह वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. सोनी गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

यावेळी खासदार संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

नळपाणी पुरवठा योजना कामासाठी 2 कोटी 50 लाख, दलीत वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी 15 लाख आणि बिरोबा मंदिर मधील सभा मंडप कामासाठी 15 लाख इतका निधी मंजूर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here