मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी, गुन्हेगारी निम्म्यावर आली, सर्वाधिक घट ‘या’ गुन्ह्यामध्ये

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी, गुन्हेगारी निम्म्यावर आली, सर्वाधिक घट ‘या’ गुन्ह्यामध्ये

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत असलेले सीसीटीव्ही, पोलिसांकडून वारंवार केले जाणारे ऑपरेशन ऑल आउट, फ महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे ५४ हजार गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले होते. चालू वर्षात याच कालावधीत गुन्ह्यांची संख्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजेच २३ हजारांवर घसरली आहे. सर्वाधिक घट चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झाली असून वाहन चोरीचे गुन्हे ४००ने कमी झाले आहेत.

मुंबई पोलिसांची २०२३ या वर्षातील पहिल्या सात महिन्यांतील मुंबईतील वेगवेगळ्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे, असे म्हणावे लागेल. पहिल्या सात महिन्यांत मुंबईतील गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. २०२२ मध्ये सात महिन्यात ५४,१०१ गुन्हे दाखल करण्यात आले होते, यंदा ही नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या २३,४६० इतकी आहे. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये किंचित वाढ वगळता इतर सर्व गुन्हे कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

सना खानचे दोन मोबाईल सापडले, ५० हून अधिक व्हिडिओ, धक्कादायक माहितीने अनेकांना धडकी भरणार
सायबर गुन्हेही काहीसे घटले

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत वेगवेगळ्या प्रकारच्या २५१६ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. २०२२ मध्ये पहिल्या सात महिन्यांत सायबर गुन्ह्यांची संख्या २९५३ इतकी होती. म्हणजेच सायबर गुन्ह्यांच्या संख्येतही ४३७ ने घट झाली आहे.

… म्हणून घटले चोरीचे गुन्हे

मोबाइल फोन चोरीला गेल्यास पोलिस गुन्हा दाखल करून न घेता तो गहाळ झाल्याची नोंद करतात. २०२२ मध्ये संजय पांडे पोलिस आयुक्त असताना त्यांनी मोबाइल चोरी झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे २०२२ मध्ये चोरीच्या गुन्ह्यांची संख्या ११,४२७ इतकी होती. पोलिसांनी पुन्हा गहाळ म्हणून नोंद करण्यास सुरुवात केल्याने चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ८,०६८ इतकी घट होऊन ही संख्या ३,३५९ इतकी झाली आहे.

चितेवर जळणारा वीर आणि योद्धे कोरलेले; ८०० वर्षांपूर्वीचे नौकायुद्धाचे पुरावशेष सापडले
जानेवारी ते जुलैमधील गुन्हेगारी

गुन्हे २०२२ २०२३ घट

हत्या ८५ ७६ ०९

हत्येचा प्रयत्न १५२ १५० ०२

दरोडा ०७ १५ ०८ (वाढ)

जबरी चोरी ५८२ ३६१ २२१

सोनसाखळी १३१ ७१ ६०

जबरी चोरी प्रयत्न १८ ११ ०७

खंडणी २०४ १५० ५४

घरफोडी (दिवसा) १४९ १३४ १५

घरफोडी (रात्री) ८४० ६२५ २१५

चोरी ११४२७ ३३५९ ८०८६

वाहन चोरी १८९८ १५०१ ३९७

मारहाण २७८८ २५४६ २४२

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

दंगल १९२ १५८ ३४

बलात्कार ५८० ५६५ १५

विनयभंग १४२९ १२४६ १८३

इतर गुन्हे ३३६०० १२४७० २८२८७

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here