पारधी समाजाच्या लाभार्थींनी विविध योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

पारधी समाजाच्या लाभार्थींनी विविध योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

मुंबई, ‍‍दि. २१ :  मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थींनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२३ – २०२४ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्रमांक 2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

******

शैलजा पाटील/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here