कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! एक्सप्रेस गाड्यांना ‘या’ दोन स्थानकावर थांबा; रेल्वे बोर्डाचा निर्णय

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! एक्सप्रेस गाड्यांना ‘या’ दोन स्थानकावर थांबा; रेल्वे बोर्डाचा निर्णय

रत्नागिरी: केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून कोकणासाठी आनंदाची बातमी आहे. कोकण विकास समितीने मागणी केलेल्या रेल्वे गाड्यांपैकी मंगला एक्स्प्रेस आणि कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांना खेड थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसनंतर आणखी एक कोकणातील उत्तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्वर स्थानकात नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे आता खेड येथून थेट दिल्लीचा प्रवास सोपा झाला आहे. त्यामुळे येथील पर्यटनालाही नव्याने चालला मिळणार आहे. या सगळ्या थांब्याची अंमलबजावणी ही २२ ऑगस्ट २०२३ पासून म्हणजे उद्यापासून केली जाणार आहे.
घरमालकांसाठी महत्वाची बातमी! भाडेकरुंची माहिती ७ दिवसात पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक; अन्यथा…
फक्त कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस ही २२११४ या क्रमांकाची गाडी २४ ऑगस्टपासून खेड येथे थांबणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी देण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात रत्नागिरीतील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवेली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घकाळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर झाल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहाच्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन संदेश झिमण यांनी वेळोवेळी आंदोलनाचे इशारे दिले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला आता मोठे यश आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव या वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने दुसरा सुखद मोठा धक्का दिला आहे. एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर आणि पदाधिकारी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा स्थानकाला देखील रेल्वे बोर्डाने खुशखबर दिली आहे. या स्थानकावर दिवा सावंतवाडी एक्सप्रेस तसेच नेत्रावती एक्सप्रेसला प्रायोगिक थांबा मंजूर करण्यात आला आहे.

शेतीसाठी कर्ज घेतलं मात्र निसर्गानं घात केला; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला करावी लागतेय मजुरी

रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे. तसेच गणेशोत्सव कालावधीत १३ सप्टेंबरपासून धावणारी सीएसएमटी मडगाव या डेली धावणाऱ्या स्पेशल ट्रेनसाठी मडुरे हा थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here