सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली ठाणे क्रिक पुलाच्या कामाची पाहणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली ठाणे क्रिक पुलाच्या कामाची पाहणी

ठाणे,दि.24(जिमाका) – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज वाशी येथील ठाणे क्रीक पुलाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी एमएसआरडीएचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, डी.एम. मोरे, नितीन बोराळे, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह पुलाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे अधिकारी व एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई पुणे महामार्गावरील खाडीवरील जुना पुल हा 1971 मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर दुसरा पुल सन 1995 मध्ये बांधण्यात आला. आता दोन पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. एक पुल मे 2024 मध्ये तर दुसरा पूल सप्टेंबर 2024 मध्ये वाहतुकीसाठी तयार होतील. सध्या ठाणे क्रिक खाडी पुलावर सध्या सहा लेनचा रस्ता आहे. या ठिकाणी आणखी या दोन पुलांचे काम सुरू आहे. या दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाल्यावर हा रस्ता बारा लेनचा होणार आहे.या माध्यमातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे श्री. भुसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ठाण्यातील साकेत पुलावरील नादुरुस्तीसंदर्भात संबंधित विभागाला कळविण्यात आले असून कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here