अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राज्यात ४ नवे थांबे; रेल्वेचा मोठा निर्णय

अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राज्यात ४ नवे थांबे; रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला आणखी चार थांबे देण्यात आले आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान दर्शन एक्स्प्रेस ही रविवारी मिरज रेल्वे स्थानकातून सुटते. तर हजरत निजामुद्दीन स्थानकातून शुक्रवारी ट्रेन सुटते. या एक्स्प्रेसला राज्यात चार थांबे देण्यात आले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळं सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. १८ ऑगस्ट म्हणजे आजपासूनचं दर्शन एक्स्प्रेस या जिल्ह्यांमधील चार ठिकाणी थांबे सुरु होणार आहेत. रेल्वेच्या निर्णयानुसार सांगली, कराड, सातारा आणि जेजुरी स्थानकावर ही एक्स्प्रेस थांबणार आहे.

दर्शन एक्स्प्रेसला यापूर्वी राज्यात मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण आणि वसई रोड या ठिकाणी थांबे होते. आता रेल्वेनं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार सांगली, कराड, सातारा आणि जेजुरीला या एक्स्प्रेसला थांबा मिळणार आहे. या निर्णयामुळं पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

लग्नासाठी आयआरएस अधिकारी असल्याची बतावणी; नंतर हुंड्यासाठी छळ, पोलिसांंकडून करेक्ट कार्यक्रम

दर्शन एक्स्प्रेसचं वेळापत्रक कसं असेल?

दर्शन एक्स्प्रेस १२४९३ ही दर रविवारी मिरज स्थानकातून हजरत निजामुद्दीन स्थानकाकडे जाण्यासाटी सुटते. ही एक्स्प्रेस मिरजहून ही एक्स्प्रेस मिरजहून पहाटे ४.५० मिनिटांना सुटेल. त्यानंतर पहिला थांबा सांगली स्थानकात ५.०२ मिनिटांना असेल. सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ही एक्स्प्रेस कराड स्थानकात ६.०२ मिनिटांना पोहोचेल. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकात ही गाडी ७.०७ मिनिटांना पोहोचेल. सातारा स्थानकातून सुटल्यानंतर जेजुरी स्थानकात ही गाडी ८.४३ वाजता असेल. सांगली, कराड आणि सातारा स्थानकात ही गाडी ३ मिनिटे थांबेल तर जेजुरी स्थानकावर या एक्स्प्रेसला २ मिनिटे थांबा असेल. त्यानंतर ही गाडी पुण्याकडे रवाना होईल.
बाळासाहेबांनी जे केलं होतं ते उद्धव ठाकरे करणार, सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघाबाबत ठाकरेंचं ठरलं…
दर्शन एक्स्प्रेस १२४९४ ही हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून शुक्रवारी सुटते. त्या एक्स्प्रेसला देखील जेजरी, सातारा, कराड, सांगली हे थांबे देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिल्लीहून सुटलेली एक्स्प्रेस राज्यात शनिवारी पोहोचते. जेजुरीला ही गाडी सायंकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी पोहोचले. साताऱ्यात रात्री ९ वाजून ४२ वाजता दर्शन एक्स्प्रेसला थांबा असेल. तर, कराडमध्ये ही गाडी १० वाजून ३७ मिनिटांनी पोहोचेल. तर, सांगली स्थानकात ११ वाजून ५२ मिनिटांनी दर्शन एक्स्प्रेस पोहोचेल.

बुमराहचा चेंडू होता की आगीचा गोळा, आऊट कसा झाला ते बॅट्समनला कळलंच नाही पाहा व्हिडिओ…

थार चालवत मिरजला रवाना, जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्याची नवीन गाडी चालवली

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here