बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

मुंबई, दि. १८ : बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत www.awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मुंबई शहर व उपनगरातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. वयवर्ष ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो, संस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. पात्र उमेदवार आणि संस्थांनी विहित वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here