गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

मुंबई, दि. ७ : विद्यादान हे पवित्र कार्य आहे. महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

स्थापनेचे १६८ वे वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या संदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावे.ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारंभ आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारंभाला सुरुवातीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील व कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे समारंभाचे विशेष अतिथी होते. अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आणि स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारंभामध्ये १,६४, ४६५ स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

०००

A transparent selection system should be implemented to select quality teachers

-Governor

Mumbai, 7th Jan : Governor and Chancellor of state universities C.P. Radhakrishnan today expressed the need to implemented a transparent system to select University and College teachers ‘purely on merit’.  Stating that teaching is a noble profession, he said the selection process should be transparent and based on efficiency.

The Governor was addressing the Annual Convocation of the 168 – year old University of Mumbai at the CowasjeeJehangir Hall at the University Campus in Mumbai.

Maharashtra Ministers ChandrakantPatil and MangalPrabhatLodha, Secretary Department of Science and Technology Government of India Prof AbhayKarandikar, President of St Louis University USA Dr Fred Pestello, VC of University of Mumbai Prof RavindraKulkarni, PRO VC Ajay Bhamare, officials, graduating students and invitees were present.

Degrees were conferred upon 1,64,465 candidates. While Ph.Ds degrees were awarded to 401 candidates, Gold Medals were presented to 18 candidates.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here