‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत – महासंवाद

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत – महासंवाद




मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दि. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 2, शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसरा भाग मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच लढा दिला नाही, तर त्यांनी देशातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाहाला बंदी यासारख्या वाईट गोष्टींचा त्यांनी विरोध केला. आयुष्यभर त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले आणि यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत, याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

०००

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here