बीड, दि. 30 (जिमाका) : केज तालुक्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे झालेल्या हत्येचा तीव्र निषेध केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केला. आज श्री आठवले यांनी दिवंगत देशमुख यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वोतपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
सकाळी श्री आठवले यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आई आणि विधवा पत्नी यांना अश्रु अनावर झाले. त्यांनी त्यांच्या भावना श्री आठवले यांच्या पुढे मांडताना न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. श्री आठवले यांनी आपण या प्रकरणाचा पाठपुरवा करून कुटूबीयांना न्याय मिळवून देण्याचा पुर्ण प्रयत्न करू असे ते म्हणाले. घडलेली घटना अतिशय वेदनादायक असून समाजाला काळीमा फासणारी आहे, अशा भावनाही श्री आठवले यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी कुटुंबासोबतच गावकऱ्यांशी संवाद साधला .
00000