विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन – महासंवाद

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन – महासंवाद




सांगलीदि. 24 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.‌राम शिंदे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे बिरोबा देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकरप्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेअपर पोलीस अधीक्षक रितू खोखरकवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसेविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्रीसुविद्य पत्नी व मुलगातसेच माजी आमदार रमेश शेंडगेजयसिंग शेंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा‌. राम शिंदे यांनी महाराष्ट्रातील दीनदुबळेवंचितशोषितसमाजाला न्याय देण्याचे काम हातून घडावेअधिक चांगले काम करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना बिरोबा देवाच्या चरणी केली.

याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रमेश शेंडगे यांनी आभार मानले.

प्रारंभी आरेवाडी हेलिपॅड मैदान येथे  जिल्हा प्रशासनाच्या वतीने विधान परिषदेचे सभापती प्रा.‌ राम शिंदे यांचे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here