जलसंपदा विभागाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा ठेवा -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

जलसंपदा विभागाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा ठेवा -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प तसेच या विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन करुन यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याच्या सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पुनर्वसन, दूधगंगा धरण गळती दुरुस्ती आदी विषयासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, धामणी प्रकल्पग्रस्तांना पुर्नवसन पॅकेज देणे व घळभरणी वेळेत पुर्ण करण्याबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करुन त्यानुसार पाणी पुजनापर्यंतच्या कामाचे नियोजन करा. धामणी प्रकल्पातील प्रकल्प्रस्तांचे पुर्नवसन करण्याबाबत शासनस्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्री व या विभागाच्या सचीवांशी बैठक घेवून चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

दुधगंगा (काळम्मावाडी) आंतरराज्य प्रकल्पाच्या गळती काढण्याबाबतच्या कामाची सुरवात करण्याबाबत संपूर्ण कामाचा आढावा घेवून सबंधित यंत्रणा व विभागाकडून कालबध्द कार्यक्रम तयार करुन  दूधगंगा धरण गळतीचे काम तात्काळ सुरु करा, अशा सूचना दिल्या.

दुधगंगा प्रकल्पाच्या डावा कालव्यावरील पनोरी, ता. राधानगरी येथील कालवा फुटल्याने या परिसरातील शेतीमध्ये पाणी आले, अशा घटना पुढील काळात होऊ नयेत याकरीता या संपूर्ण भागाचे अस्तरीकरण करण्याबाबत  तसेच भविष्यात कालवा गळतीचे प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

दुधगंगा प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावामध्ये बंदिस्त पाईप लाईन (PDN) समावेश करण्याबाबत सबंधित यंत्रणेमार्फत सादरीकरण करा. शासनाकडून प्रकल्पाची सुधारित प्रशासकिय मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा करा.

नियोजित बसुदेव-भुजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करुन आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव सविस्तर अंदाजपत्रकासह शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करा.

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये दुधगंगा, पाटगांव, राधानगरी व धामणी मध्यम प्रकल्पातून नियोजित उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळण्याबाबतच्या प्रस्तावांचा आढावा घेवून या प्रकल्पांना मंजूरी मिळण्याबाबतचे  प्रस्ताव शासनास सादर करा, असे त्यांनी सांगितले.

दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पांतर्गत कुर पोटकालवा कि.मी.क्र.१ ते १७ मधील अस्तरीकरणाचे काम विहित वेळेमध्ये पूर्ण करा, अशा सूचना देवून धामणी मध्यम प्रकल्प, पाटगांव, केळोशी (लोंढा नाला) व दुधगंगा प्रकल्पांतर्गत गैबी बोगद्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, गेटेड वियर बंधारे प्रस्तावित करुन त्यास निधीची तरतुद करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री आबिटकर यांनी सांगितले.

दूधगंगा धरण गळती दुरुस्तीचे काम जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. पनोरी कालवा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेवून 15 दिवसांत पूर्ण करुन 21 डिसेंबर पासून आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी दिली.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here