‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




नागपूर, दि. 16 : मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाता़ची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक (रॅन्डम) पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली असून त्या लवकरच बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत. बेस्ट बसेसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ‘बेस्ट’ प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या पीठासीन अधिकारी होत्या.

००००

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here