विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ ला भेट

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची ‘सुयोग’ ला भेट




नागपूर,दि. १५: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.

शिबिर प्रमुख प्रवीण पुरो व नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिबिर सहप्रमुख प्रमोद डोईफोडे, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे, विधीमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. अधिवेशनानिमित्त करण्यात आलेली तयारी, कार्यक्रम, विविध सुविधा आदी बाबींची माहिती त्यांनी दिली.  विधीमंडळाचे यू-ट्यूबद्वारे होणारे प्रक्षेपण अधिक प्रभावी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, असेही त्यांनी सां‍गितले.

त्यांनी सुयोग पत्रकार सहनिवास येथील सभागृह, निवास कक्ष, माध्यम कक्ष, भोजनगृह आदी व्यवस्थेची पाहणी केली.

०००

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here