सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




मुंबई, दि. ९ : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी  ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील 12 कोटी जनता आणि जगभरातील मराठी माणूस कर्नाटक सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी  आम्ही शिक्षण, आरोग्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. यापुढे देखील सीमा भागातील मराठी भाषिकांचे  प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सरकार तत्पर राहील.

०००







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here