लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन – महासंवाद

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन – महासंवाद




अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता उद्या, 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरु होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीत सहभाग नोंदवत लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पुढे यावे. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करावे, असेही आवाहन डॉ. पाण्डेय यांनी सर्व मतदारांना केले.

000







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here