कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2023-24 सांगली येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म व नेटके नियोजन करावे, अशा सूचना कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूरचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, आकाशवाणी सांगली कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, शेखर इनामदार, डॉ. प्रशांत इनामदार, नरेंद्रकुमार गाढवे, गजानन शेळके, हणमंत सरगर, देवेंद्र पाटील, प्रविण नंदगावे, गजानन मगदूम, एम. एस. आलासे आदि उपस्थित होते.

बैठकीत स्पर्धा स्थळ व तारीख अंतिम करण्याबाबत तसेच स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, सामनाधिकारी, अधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेबाबत चर्चा करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भोजन व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पाणी व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, बॅरिकेटींग, स्पर्धेसाठी आवश्यक स्टेज, मंडप, विद्युत व्यवस्था व तसेच अन्य आवश्यक बाबींबाबत संबंधितानी काटेकोर नियोजन करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहावे. त्यासाठी आवश्यक निधीसाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here