मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : – अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी ‘रिंगाण’ मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

‘आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा- गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात श्री. खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणा मिळणार आहे.लेखक, कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हातून यापुढेही अशीच दर्जेदार साहित्य सेवा घडत राहील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here