विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर दि. 18 : विविध आयुधांचा वापर करत विधिमंडळ सदस्यांनी विधिमंडळात सामाजिकसार्वजनिक हिताचे प्रश्न मांडावेत. प्रश्न मांडताना विशेष काळजी घ्यावी. योग्य वेळी योग्य विषय मांडल्यास त्या विषयाला उचित न्याय मिळवून देता येतो. यासाठी विधिमंडळ सदस्यांनी  विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधानमंडळात प्रश्न मांडावेतअसे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध संसदीय आयुधे‘ या विषयावर विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन करताना केले.

विधानभवन येथे सदस्यांना विविध संसदीय आयुधे‘ या विषयावरील मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. याप्रसंगी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासमवेत विधिमंडळाचे सचिव (२)  विलास आठवलेसचिव ऋतुराज कुडतरकर  उपस्थित होते. यावेळी विधिमंडळ सदस्य डॉ. मनीषा कायंदेअमोल मिटकरीज्ञानेश्वर म्हात्रेसुधाकर अडबालेआणि किरण सरनाईक उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्याविविध आयुधांचा वापर करून विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे सदस्यांची राज्यभर प्रतिमा निर्माण होत असते. विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे होणारा परिणाम यासह या प्रश्नांची व्याप्ती याबाबतचा सखोल अभ्यास विधिमंडळ सदस्यास असावा. याबरोबरच महत्वाच्या घडामोडीघटनांकडे सभागृहाचे लक्ष त्याला वेधता यावे.

विधिमंडळ सचिव श्री. आठवले व  श्री. कुडतरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनतारांकित प्रश्नअतारांकित प्रश्नऔचित्याचे मुद्देविशेष उल्लेखठरावलक्षवेधीस्थगन प्रस्तावपुरवणी मागण्यांवरील चर्चाअल्पकालीन चर्चाविधानपरिषद सदस्य विशेष अधिकारशासकीय  विधेयक व अशासकीय विधेयकराज्यपाल अभिभाषणअर्थसंकल्पावर चर्चा या विषयांवर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

तारांकित प्रश्नात कोणत्या स्वरूपाचे प्रश्न मांडावेत. तसेच ठरावामध्ये कोणत्या धोरणात्मक बाबी मांडल्या जाव्यातप्रश्नांच्या उत्तरासाठी पाठपुरावा कशा पद्धतीने करावा याबाबतही श्री. आठवले व श्री. कुडतरकर यांनी सदस्यांना माहिती दिली.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here