वसतिगृहातील महिला व मुलींशी साधला संवाद; नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी

वसतिगृहातील महिला व मुलींशी साधला संवाद; नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी

नागपूर दि.27 : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या वसतिगृहांना आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी महिला व मुलींशी चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज काटोल रोड व कामठी रोडवरील शासकीय मुलींचे बालगृह, सरस्वती मतिमंद महिलांचे वसतीगृह, सखी वन स्टॉप सेंटर तसेच करूणा महिला बालगृह येथे भेट दिली.

श्रीमती तटकरे यांनी वसतीगृहातील महिला व मुलींच्या आरोग्याची देखभाल, सकस आहार, शाळा-कॉलेज मधील उपस्थिती, अनाथ मुलींना पालक मिळवून देण्यासाठी होत असलेले प्रयत्न याबाबत माहिती जाणून घेतली.  शासकीय व विविध सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमात मुलींना सहभागी करून घेत त्यांना मानसिक, शारिरिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय आयुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर, वसतीगृहाच्या अधीक्षीका मनिषा आंबेडारे व एस.एस.मांडवेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आदि उपस्थित होते.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here