राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागविण्यात येत आहे.  कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे. प्रदर्शनातील पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 22620231/32 या क्रमांकावर संपर्क साधावा.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here