‘विदर्भाची भाग्यरेषा’ कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘विदर्भाची भाग्यरेषा’ कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

भंडारा, दि.7 :जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने प्रकाशित विदर्भाची भाग्यरेषा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले.

या कार्यक्रमाला  खासदार सुनिल मेंढे,माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले  यांच्यासह अन्य मान्यवर तसेच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. गोसेखुर्द प्रकल्पाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या या पुस्तिकेमध्ये गोसेखुर्द प्रकल्पाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द  प्रकल्पाची सविस्तर माहिती या कॉफी टेबल बुकमध्ये देण्यात आली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here