स्वामी रामानंद तीर्थ यांना विधानभवनात अभिवादन

स्वामी रामानंद तीर्थ यांना विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उप सभापतीचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबूडकर, विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here