मुंबई, दि. 28 : ‘बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
निवासस्थानाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक पद्धतीने कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्तीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विधीवत विसर्जन करण्यात आले.
0000