जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 22 (जिमाका वृत्तसेवा): चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. यावेळी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील देवळा तालुक्यातील महत्त्वाचा असलेला एनएच ७५२ जी सटाणा-देवळा-मंगरूळ रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या भू संपादित होणाऱ्या जमिनीच्या अडचणीं संदर्भात व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी गडावर जाणारा नाशिक दिंडोरी वणी रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा व रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील वाहनधारक व  स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग 848 हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरातला जाणाऱ्या रस्त्यावरील कोटंबी व सावळघाटासह अनेक कामे प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू नये. तसेच टोल  परिसरातील २० किलो मीटरच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देण्यामागची व नियमित शेतमाल ने- आण करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना टोलमध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली असून त्यासाठी केंद्रीय मंत्री  श्री. गडकरी यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार करू, असे यावेळी सांगितले.

प्रस्तावित असलेला सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड रस्त्यासाठी भूसंपादन व शेतकऱ्यांना त्याबाबतचा योग्य मोबदला मिळण्याबाबतदेखील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सविस्तर चर्चा करून निवेदन दिल्याचे राज्यमंत्री डॉ.पवार यांनी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here